Join us  

राज्यात केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत मेडिकल स्टोअर्सची संख्या वाढवा; डॅा दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: August 10, 2023 1:27 PM

उपलब्ध माहिती नुसार देशात १४० अंदाजे अमृत फार्मसी आहेत. तर मुंबईत फक्त अंधेरी, कुलाबा,चेंबूर आणि मुलुंड या ठिकाणी अमृत फार्मसी आहेत.

मुंबई-महाराष्ट्रात  केंद्राच्या अमृत ( अफॉरडेबल मेडिसिन अँड रिलायबल इम्प्लांटस् फॉर ट्रिटमेंट) या योजने अंतर्गत आरोग्य विभागाच्या सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल स्टोअर्सची संख्या वाढवा, अशी मागणी राज्याच्या कूपोषण निर्मूलन टास्क फोर्स कृती दल समितीचे अध्यक्ष व माजी आरोग्य मंत्री डॅा दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मुळे विविध प्रकारच्या कॅन्सरग्रस्त रूग्णाना आर्थिक मदत मिळणार आहे.या औषधासाठी अनेक रूग्णाना पैसे नसल्याने आवश्यक उपचार घेता येत नाही. त्यामुळे अमृत औषध दुकाने केंद्र शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उपलब्ध माहिती नुसार देशात १४० अंदाजे अमृत फार्मसी आहेत. तर मुंबईत फक्त अंधेरी, कुलाबा,चेंबूर आणि मुलुंड या ठिकाणी अमृत फार्मसी आहेत. एकूण उपचाराधीन कॅन्सर रूग्णाची संख्या पाहाता  व कॅन्सर रुग्णांच्या आजारपणावर खर्च करण्याची क्षमता पाहाता हे प्रमाण खूप व्यस्त आहे. या फार्मसीत एकूण २२०० ड्रग्ज् असावेत ही अपेक्षा आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर येथे एकंदर रूग्णांचे प्रमाण पाहता अमृत फार्मसीची संख्या वाढवण्यासाठी केंद्राकडे मुख्यमंत्री महोदयानी प्रयत्न करावेत अशी मागणी डॅा दीपक सावंत यांनी केली आहे.

 कॅन्सर औषधाबरोबर कार्डीओव्हस्क्युलर ड्रग्ज सर्जिकल ईम्पांटस् ६०% ते८०% कमी दरात  मिळतात.२०२३ च्या आकडेवारी नुसार २.२५ मिलीयन कॅन्सर रूग्ण भारतात आहेत व १५.७लाख रूग्ण प्रत्येक वर्षी वाढण्याचा २०२५ अंदाज व्यक्त केला जातो.अश्या परिस्थितीत कॅन्सर मेडिसिन खूप महत्वाचे आहे. केमो थेरपी पूर्ण स्वरूपात २०१७-१८ च्या निर्णयानुसार सक्षमतेने सुरू व्हावी असेही मत डॅा दीपक सावंत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :दीपक सावंतएकनाथ शिंदेवैद्यकीय