Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेच्या पाच विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने पाच विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने पाच विशेष गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ केली आहे. त्यासाठी विशेष भाडे आकारले जाणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश मिळेल.

यामध्ये मुंबई सेंट्रल-समस्तीपूर विशेष गाडीच्या आठ फेऱ्यांत वाढ होणार आहेत. ही गाडी १, ३, ५ आणि ७ जूनला चालविण्यात येईल, तर समस्तीपूर-मुंबई सेंट्रल विशेष गाडी ३, ५, ७ आणि ९ जूनला धावेल. मुंबई सेंट्रल भागलपूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्यांत वाढ केली आहे. ही गाडी ४ जून रोजी, तर भागलपूर-मुंबई सेंट्रल विशेष गाडी ७ जूनला चालविण्यात येईल. उधना-दानापूर सुपरफास्ट विशेष गाडीच्या दोन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. उधना-दानापूर विशेष गाडी ३१ मे रोजी, तर दानापूर-उधना विशेष गाडी २ जूनला चालविण्यात येईल.

उधना-छपरा सुपरफास्ट विशेष गाडीच्या दोन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. दानापूर-उधना विशेष गाडी ४ जून आणि छपरा-उधना विशेष गाडी ६ जूनला चालविण्यात येईल. राजकोट-समस्तीपूर विशेष गाडीच्या दोन फेऱ्या वाढल्या आहेत. राजकोट-समस्तीपूर ही गाडी २ जूनला, तर समस्तीपूर-राजकोट विशेष गाडी ५ जूनला चालविण्यात येईल.

..............................