Join us
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी डॉक्टरच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

बलात्कारी डॉक्टरच्या पोलीस कोठडीत वाढ

बलात्कारी डॉक्टरच्या पोलीस कोठडीत वाढ

मुंबई : मुलुंडमध्ये अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी डॉ. जयेश कतिरा (४८) या नराधमाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुलुंड कॉलनीतील डॉ. जयेश कतिरा यांच्या आकांक्षा नर्सिंग होममध्ये पोटदुखीची तक्र ार घेवून गेलेल्या १७ वर्षीय मुलीचे नग्न फोटो काढून ते सोशल नेटवर्किंग साईटवर टाकण्याची धमकी देत या नराधमाने मुलीवर बलात्कार केला. शनिवारी बलात्काराच्या गुन्ह्यात डॉ. कतीरास अटक करण्यात आली. १२ तारखेपर्यंत त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली होती. न्यायालयाने आज कतिराच्या पोलीस कोठडीत वाढ करत त्याला १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय कारणास्तव पोलीस कोठडीत वाढ करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी रावसाहेब जाधव यांनी दिली. कतिराच्या नर्सिंग होममधील महिला कर्मचारी वर्गाचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्याकडून कतिरा विरोधात तक्र ारी आढळलेल्या नाहीत. मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)