Join us

मुंबईच्या किमान तापमानात वाढ

By admin | Updated: January 9, 2016 02:38 IST

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव काहीसा ओसरला असून, मुंबईच्या किमान तापमानातही काही अंशी वाढ झाली आहे.

मुंबई : उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव काहीसा ओसरला असून, मुंबईच्या किमान तापमानातही काही अंशी वाढ झाली आहे. परिणामी शहरातील थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असून, ढगाळ वातावरणामुळे मुंबई शहरातील हवा पालटली आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ११.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मागील चोवीस तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मुंबईचे किमान तापमान आठएक दिवसांपूर्वी १४ अंशांवर घसरले होते.