Join us

भायखळा, वांद्रे, अंधेरी येथे कोरोना रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मुंबईतील रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर एक टक्क्याहून कमी ...

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मुंबईतील रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर एक टक्क्याहून कमी ठेवण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. भायखळा, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम, चेंबूर या भागांमध्ये रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०७ ते ०.११ टक्के एवढा आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर मुंबईत दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. मार्च - एप्रिल महिन्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ होऊन दररोज नऊ ते दहा हजार रुग्ण आढळत होते. प्रतिबंधक उपाययोजना आणि कडक निर्बंधांनंतर अखेर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. ऑगस्ट महिन्यापासून दररोजची रुग्ण संख्या दोनशे ते अडीचशेवर आली होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्येमध्ये पुन्हा वाढ दिसून येत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परळ-लालबाग, सायन-माटुंगा या भागांमध्ये दैनंदिन रुग्णांचे प्रमाण वाढले होते. मात्र आता हीच रुग्ण वाढ भायखळा-नागपाडा, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम-विले पार्ले पश्चिम, चेंबूर, डोंगरी, गोरेगाव आणि सायन माटुंगा या भागांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ दिसून येत आहे.

या विभागात रुग्ण वाढ

विभाग....दैनंदिन रुग्ण वाढ(टक्के)

ई ..भायखळा, नागपाडा - ०.११

एच पश्चिम...वांद्रे पश्चिम...०.०९

के पश्चिम...अंधेरी पश्चिम...०.०८

एम पश्चिम....चेंबूर....०.०७

बी...डोंगरी....०.०७

एफ उत्तर..माटुंगा - सायन...०.०७

पी दक्षिण...गोरेगाव....०.०७