Join us
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल भाजपामध्ये इनकमिंग

By admin | Updated: October 1, 2014 23:15 IST

माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्या भाजपा प्रवेशामुळे पनवेल तालुक्यात कमळ फुलले आहे.

पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांच्या भाजपा प्रवेशामुळे पनवेल तालुक्यात कमळ फुलले आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे कार्यालय प्रवेशाच्या कार्यक्रमाने गजबजून गेले असून तालुका कमळमय होऊ लागला आहे. अल्पसंख्याक समाजातील अनेक नेते आणि पदाधिका:यांनी कमळ हातात घेतल्याने विरोधकांसमोर आव्हान उभे राहिले आहे.गेली दहा वर्षे पनवेल तालुक्यात काँग्रेस पक्ष तुल्यबळ होता. शेतकरी कामगार पक्षाला शह देण्याचे काम माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. लालबावटय़ाचा गड काबीज करून हाताचा पंजा बळकट करण्यास त्यांचा मोठा वाटा होता. काँग्रेस पक्षात चांगला जम बसला असताना टोल प्रश्नावरून ठाकूर यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. काही दिवसांपूर्वी त्यांनी सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त कार्यकत्र्याबरोबर भाजपात प्रवेश केला. पूर्वी पनवेलच काय तर रायगडातही भाजपाचा प्रभाव नव्हता. मात्र ठाकूर यांच्या प्रवेशाने पनवेल विभागात तर कमळ कमळ आणि कमळाचा बोलबाला सुरू झाला आहे. गेली दहा वर्षे शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस या दोन पक्षात इनकमिंग अधिक असायचे. काँग्रेसमधून शेकाप किंवा लालबावटा सोडून तिरंगा झेंडा हातात घेणा:यांची संख्या अधिक असत. आत रामशेठ भाजपावासीय झाल्याने काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरू झाले आहे. इतकेच नाही तर इतर पक्षातून भाजपामध्ये प्रवेश करणा:यांची संख्या वाढत चालली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मनगटातील घडय़ाळ सोडून हातात कमळ घेतले आहे. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रूपाली थिअटर समोरील कार्यालय त्याचबरोबर रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी दररोज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडत आहे. काही ठराविक नेते आणि पदाधिकारी वगळता काँग्रेस पक्षातील बहुतांशी पदाधिकारी आणि नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. (वार्ताहर)
 
4कॉंग्रेस जिल्हा चिटणीस मुस्तफा बेग ऊर्फ मुन्नाभाई यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ केली होती. त्यांना पक्षातच राहावे याकरिता काँग्रेसजणांकडून प्रय}ही झाले मात्र बेग यांच्या हातात कमळ देऊन त्यांना भाजपवासीय करण्यास ठाकूर यांना यश आले आहे. पूर्वाo्रमीचे शिवसैनिक मुन्नाभाई यांनी प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या नेतृत्वाची तालुक्याला गरज असल्याने हा धाडसी निर्णय घेतल्याचे सांगितले.
4व्यतिरिक्त माथाडी नेते हनुमंत पिसाळ यांच्यासह माथाडी कामगारांच्या हातात भाजपाचा झेंडा देण्यात आला आहे. कालच नेवाळी येथील शेकापच्या युवा कार्यकत्र्यानी भाजपात प्रवेश केला