Join us

महापालिकेच्या कंत्राटदारांवर आयकर विभागाचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 05:11 IST

मुंबई महापालिकेच्या बड्या कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापे टाकल्याचे वृत्त आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या बड्या कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापे टाकल्याचे वृत्त आहे. गेल्या तीन दिवसांपासून या कंत्राटदारांवर छापे मारण्यात येत आहेत. एपीआय एआयसी लँडमार्क या अरविंद जैन यांच्या कंत्राटी कंपनीवर छापे टाकण्यात आले आहेत. कंत्राटदारांच्या घरी व कार्यालयात छापे टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या अन्वेषण विभागाकडून हे छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात महापालिकेच्या कंत्राटदारांनी दलाली दिल्याचा उल्लेख असलेली डायरी सापडल्याचा दावा करण्यात आला. मात्र त्याला दुजोरा मिळाला नाही.महापालिकेच्या काळ््या यादीतील कंत्राटदारांची आयकर विभागातर्फे चौकशी सुरु होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर कंत्राटदारांवर छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले.