मुंबई : पश्चिम उपगरातील मालाड आणि गोरेगाव येथे सोमवारी आग लागण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही.मालाड पश्चिम एव्हरशाईननगर येथील एका खुल्या मैदानात असलेल्या ५० झोपड्यांमध्ये सोमवारी पहाटे ३ वाजता आग लागली. एका झोपडीतील लाकडी आणि इलेक्ट्रीकल साहित्याला लागलेली आग काही वेळातच पसरली. वेगाने पसरणारी आग पाहून पुढचा अनर्थ टाळण्यासाठी वेळीच रहिवाशांनी झोपड्यांतून बाहेर पळ काढला. अग्निशमन दलाने वेळीच दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. मात्र ही आग कशामुळे लागली त्याबाबतचे नेमके कारण समजू शकले नसून, पुढील तपास सुरू आहे.गोरेगाव पूर्वेकडील हब मॉलशेजारी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी सकाळी आग लागल्याची लागली. येथील पोडीयम पीच्या पाईपाला आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेतही कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. (प्रतिनिधी)
मालाड, गोरेगावमध्ये आगीच्या घटना
By admin | Updated: December 16, 2014 01:37 IST