मुंबई : मुंबईमधील शाळांमध्ये स्वच्छतागृह आणि पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याच्या योजनेचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी धारावीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार होणार आहे. त्याचवेळी धारावीमधील गणेश विद्यामंदिर शाळेतील पहिल्या बायोटॉयलेटचे उद्घाटनही चव्हाण यांच्या हस्ते होईल.झोपडपट्टीतील शाळांमध्ये स्वच्छतागृह आणि पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मुंबईतील ५00 हून अधिक शाळांना या सुविधेचा फायदा होणार आहे. मुंबईतील शाळांना या योजनेद्वारे पारंपरिक पद्धतीचे आणि प्री फॅब्रिकेशन टॉयलेट देण्यात येणार आहेत. स्वातंत्र्यदिनी धारावीतील गणेश विद्यामंदिर शाळेत पहिल्या बायोटॉयलेटचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. गुरुवारी म्हाडाचे सीईओ आनंद रायते, आमदार कपिल पाटील यांनी धारावीतील शाळांची पाहणी केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई आणि उपनगरातील सर्व विभागात ३६ टॉयलेट लावण्यात येणार आहेत. पुढील सहा महिन्यांत मुंबईतील सर्व शाळांचा या योजनेत समावेश होणार असून मुला-मुलींसाठी या योजनेत स्वतंत्र टॉयलेट्स असणार आहेत. (प्रतिनिधी)
धारावीतील शाळेत पहिल्या बायोटॉयलेट्सचे उद्घाटन
By admin | Updated: August 15, 2014 02:46 IST