Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाटी व एरंगळ येथील विकासकामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:15 IST

मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वतीने एरंगळ येथे मुख्य रस्त्यापासून संत बोव्हेंचर चर्चपर्यंत पर्जन्य जलवाहिनी (भूमिगत गटार) व रस्ता ...

मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वतीने एरंगळ येथे मुख्य रस्त्यापासून संत बोव्हेंचर चर्चपर्यंत पर्जन्य जलवाहिनी (भूमिगत गटार) व रस्ता बांधकाम तसेच भाटी कोळीवाडा येथे मुख्य रस्त्यापासून भाटी कोळीवाड्यापर्यंत पर्जन्य जलवाहिनीच्या (भूमिगत गटार) बांधकामाचे विभागप्रमुख सुधाकर सुर्वे व पी /उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा व वार्ड क्र. ४९च्या स्थानिक नगरसेविका संगीता सुतार यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. नगरसेविका संगीता सुतार व समाजसेवक संजय सुतार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

या प्रसंगी संजय सुतार, उपविभागप्रमुख अँथोनी पाॅल, शाखाप्रमुख संदेश घरत, नितीन कास्कर, राजीव कोळी, सुधाकर गुरव, प्रभाकर कोळी, मोरेश्वर कोळी, समीर म्हात्रे, कृष्णा कोळी, मायकल किल्मो, रमेश नाईक, डाॅमनिक कोळी आदी शिवसैनिक व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

--------------------------