Join us

डिसेंबर महिन्यात मुंबई विमानतळावरून केला ४८ लाख लोकांनी प्रवास

By मनोज गडनीस | Updated: January 11, 2024 17:51 IST

डिसेंबर महिन्यात प्रवासी संख्येचा उच्चांक

मुंबई - नुकत्याच सरलेल्या डिसेंबर महिन्यात मुंबई विमानतळावरून तब्बल ४८ लाख ८० हजार लोकांनी प्रवास केला असून या निमित्ताने एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ च्या वर्षात मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात प्रवासी संख्येचा सर्वोच्चांक गाठला  गेला आहे.

१६ डिसेंबर २०२३ या एका दिवसात विमानतळावरून तब्बल १ लाख ६५ हजार २५८ लोकांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने प्रवास करण्याचा हा ही एक उच्चांक मानला जात आहे. २०२२ या वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये मुंबई विमानतळावरून एकूण ४३ लाख ७० हजार लोकांनी प्रवास केला होता. त्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये प्रवासी संख्येत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कोरोना काळानंतर अर्थात २०१९ नंतर ही प्रवासी वाढ तब्बल ११२ टक्के इतकी आहे.

टॅग्स :विमानतळ