Join us  

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा-शाखांमधील गटप्रमुखांच्या बैठकांना जोर

By मनोहर कुंभेजकर | Published: March 21, 2024 5:54 PM

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताना सर्वांसमोर उपनेते अमोल कीर्तिकर यांचे नाव आगामी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून जाहीर केले होते. 

मनोहर कुंभेजकर, मुंबई : दोन आठवड्यांपूर्वी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताना सर्वांसमोर उपनेते अमोल कीर्तिकर यांचे नाव आगामी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून जाहीर केले होते. 

यानंतर जिवाची बाजी करून "आपल्या अमोलला" लोकसभेवर भारी मतांनी निवडून आणायचेच असे एकमेव लक्ष समोर ठेवून येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे. पक्षाने या लोकसभा मतदारसंघासाठी नेमून दिलेले समन्वयक आमदार विलास पोतनीस हे देखिल कामाला लागले असून त्यांच्या गटप्रमुखांपर्यतच्या बैठकांना जोमाने सुरूवात झाली आहे. 

 उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखा-शाखांमधील गटप्रमुखांच्या बैठकांना जोर आला आहे.काल रात्री वर्सोवा व अंधेरी पश्चिम विधानसभेच्या महिला व पुरूष गटप्रमुखांपर्यतच्या कार्यकर्त्यांच्या बैठका संपन्न झाल्या. 

सदर बैठकीला आमदार विलास पोतनीस, उपनेत्या व महिला विभाग संघटिका राजूल पटेल, तसेच अमोल कीर्तिकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची रूपरेषा कार्यकर्त्यां समोर स्पष्ट केली. 

यावेळी विधानसभा संघटक शैलेश फणसे व सजय कदम, समन्वयक बाळा आंबेरकर व सुनील खाबिया, तसेच विधानसभेतील पुरूष व महिला उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४