Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोराईत ग्रंथ तुमच्या दारीचे नवीन वाचन केंद्र झाले सुरू  

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 9, 2024 17:36 IST

ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागातील ही १६० वी ग्रंथ पेटी येथे सुरू झाली.

मनोहर कुंभेजकर, मुंबई :बोरिवली पश्चिम दत्तसेवा विश्वस्त संस्था गोराई -२ यांच्या कार्यालयात आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर  कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभाग यांच्या सहकार्याने नविन वाचन केंद्राचे (ग्रंथ पेटी) मुंबई विभागाचे मुख्य समन्वयक डॉ.महेश अभ्यंकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागातील ही १६० वी ग्रंथ पेटी येथे सुरू झाली.

 डॉ.महेश अभ्यंकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . ग्रंथ तुमच्या दारी मुंबई विभागाची जोमाने वाटचाल सुरू असून मुंबई मध्ये १६० ग्रंथ पेटी केंद्र असून १०००० वाचक वर्ग या उपक्रमास जोडले गेले आहेत ह्या सुवर्ण संधीचा उपयोग सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

 यावेळी माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर,सह समन्वयक महादेव भिंगार्डे, मनोहर भातुसे, नारायण पवार, परिणिती माविनकुर्वे,संदिप जोशी तसेच विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव,पदाधिकारी व सभासद, विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईबोरिवली