Join us

सुधारित धोरणाने शैक्षणिक संस्थांना भूखंड

By admin | Updated: December 27, 2014 00:38 IST

धार्मिक तथा अध्यात्मिक उपक्रम तसेच संयुक्त शाळा आणि ज्युनियर कॉलेजेसना भूखंड वाटप करण्यासाठी सिडकोने सुधारित धोरण मंजुर केले आहे

नवी मुंबई : धार्मिक तथा अध्यात्मिक उपक्रम तसेच संयुक्त शाळा आणि ज्युनियर कॉलेजेसना भूखंड वाटप करण्यासाठी सिडकोने सुधारित धोरण मंजुर केले आहे. जाहिरातीच्या माध्यमातून यापुढील सर्व भूखंड वाटपाला हे धोरण लागू होणार आहे. नवी मुंबईमध्ये धार्मिक तथा अध्यात्मिक प्रयोजनार्थ तसेच संयुक्त शाळा आणि ज्युनियर कॉलेजकरिता भाडेपट्ट्याने भूखंड वज्ञपाचे धोरण संचालक मंडळाने मंजूर करून अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविले आहे. या धोरणास १ सप्टेंबर २०१४ च्या पत्रान्वये निर्देशित केलेल्या सुधारणांसह सिडको संचालक मंडळाने २ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या बैठकीत या सुधारित धोरणाला मंजुरी दिली आहे. धार्मित तथा अध्यात्मिक आणि संयुक्त शाळा व ज्युनियर कॉलेजसारख्या विविध उपयोगाच्या भूखंड वाटपाच्या धोरणात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्याच्या अनुषंगाने हे सुधारित धोरण तयार केले आहे. यापुढे वाटप करण्यात येणाऱ्या सर्व भूखंडांना हे धोरण लागू राहील. (प्रतिनिधी)