मुंबई : भारतामध्ये प्रत्येक राज्याची एक पांरपरिक वेशभूषा आहे. त्यावरून प्रत्येक राज्याचे वेगळेपण दिसून येते, अशी विविध पेहराव संस्कृती फक्त भारताताच दिसून येते. त्यामुळे आज फॅशन क्षेत्रात जगात भारताचे अधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी येथे केले. एनसीपीए येथे नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने आयोजित केलेल्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल बोलत होते. ते पुढे म्हणाले, भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. वेगवेगळे पेहराव भारतात केले जातात, त्यामुळे आता फॅशन हे ग्लॅमरपुरतेच मर्यादित नाही तर ती काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसायसुद्धा झाला आहे. फॅशन उद्योगामुळे अनेक शेतकरी, विणकरी, कापड उद्योगाशी निगडित लोकांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष रोजगार मिळत असतो, परंतु फॅशन डिझायनिंग करत असताना फॅशन क्षेत्रातील प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारीही ओळखली पाहिजे, असेही राज्यपालांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)
फॅशन क्षेत्राला भारतात महत्त्वाचे स्थान - राज्यपाल
By admin | Updated: May 27, 2014 03:03 IST