Join us

महत्वाची बातमी! कसाऱ्याला जाणार असाल तर...; मालगाडीचे इंजिन फेल, वाहतूक ठप्प

By अनिकेत घमंडी | Updated: October 25, 2023 17:52 IST

आसनगाव कसारा मार्गावर जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली. शेकडो प्रवाशांनी रेल्वेरुळातू न मार्ग काढत कसारा स्थानक गाठले.

डोंबिवली: कसारा मार्गे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन उंबरमाळी थांब्यादरम्यान फेल झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी 4:30 वाजेदरम्यान घडली. पावणे सहाच्या सुमारास इंजिन कसाराहून आले असून मालगाडीला लावून मालगाडी निघाली आहे.

त्यामुळे  आसनगाव कसारा मार्गावर जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली. शेकडो प्रवाशांनी रेल्वेरुळातू न मार्ग काढत कसारा स्थानक गाठले. मुंबई येथून कसारा जाणारी लोकल आसनगाव येथे रद्द करण्यात आली असून त्या लोकलमधील प्रवाशांचे हाल झाले. कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असो चे शैलेश राऊत यांनी ही माहिती दिली.

या गोंधळामुळे अप/डाऊन मार्गावरील लोकल वाहतुक ठप्प झाली, तासभर झाला तरी रेल्वेची सेवा सुरू नसल्याने प्रवासी हैराण झाले होते. 

उबरमाळी  रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीचे  इंजिन बंद पडल्याने एक तास वाहतूक कोंडी झाली होती. लोकल अगोदर मालगाडी पुढे काढत असल्याने आठवड्यातून 2 दिवस तरी लोकलचा प्रॉब्लेम होतो. प्रवासी संघटना कुचकामी असल्याचा प्रवाशांनी आरोप केला आहे. 

टॅग्स :मुंबई लोकलमध्य रेल्वे