मुंबई : झोपडपट्टय़ांमध्ये दयनीय अवस्थेत जगणा:यांना चांगले जीवन देण्यासाठी 2क्क्क् सालार्पयतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची ताबडतोब काटेकोरपणो अंमलबजावणीसाठी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान यांनी आज संबंधित विभागांना दिले.
नसीम खान यांच्या उपस्थित मंत्रलयात यासंबंधी बैठक झाली. या वेळी नसीम खान म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने सन 2क्क्क्पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याचा तसेच या झोपडय़ांमध्ये राहणा:या नागरिकांचे योग्य पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील सविस्तर शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. राज्यातील आणि विशेषत: मुंबईतील झोपडपट्टीधारकांना याचा लाभ होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व संबंधित विभागांनी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
शिवाय सन 2क्क्क् पर्यंतच्या झोपडीची 2क्12-13 मध्ये विक्री झाली असल्यास हस्तांतरण धोरणानुसार त्यालाही संरक्षण आणि पुनर्वसनाचा लाभ मिळणार आहे. या धोरणानुसार निवासी झोपड्यांना 4क् हजार रुपये तर व्यावसायिक झोपड्यांना 6क् हजार रुपये भरु न पुनर्वसनाचा लाभ घेता येणार आहे. पुर्नवसन प्रकल्पात 1995 नंतरच्या आणि 2क्क्क् पूर्वीच्या झोपडीधारकांना अपात्र ठरविण्यात येत आहे. नवीन निर्णयानुसार असे झोपडीधारकही पुनर्वसनासाठी पात्र आहेत. त्यामुळे या वाढीव झोपडीधारकांचेही त्याच प्रकल्पात पुनर्वसन करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. (प्रतिनिधी)