Join us

पालिकेने केली तात्काळ सफाई

By admin | Updated: June 25, 2015 00:50 IST

जव्हार नगरपरिषद हद्दीतील सोनार आळी येथील सार्व. शौचालया समोरील घाण तसेच शौचालयाचा सेफ्टी टॅन्क नेहमी प्रमाणे उघडा झाला होता.

जव्हार : जव्हार नगरपरिषद हद्दीतील सोनार आळी येथील सार्व. शौचालया समोरील घाण तसेच शौचालयाचा सेफ्टी टॅन्क नेहमी प्रमाणे उघडा झाला होता. स्थानिकांनी वारंवार पालिकेच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. परंतु त्यांच्या सांगण्याकडे पािलकेने काणडोळा केला होता. हीच बाब स्थानिकांनी लोकमतला सांगितल्यावर लोकमतने याला वाचा फोडली. त्याचा तातडीने परिणाम होऊन पालिकेने त्वरीत साफसफाई करून टाकली.सोनार आळीतील रहिवाशांना या तुटक्या संडासामुळे कित्येक वर्षापासून दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहेत. याबाबत पालिकेने या सार्वजनिक शौचालय वापरणाच्या लोकांना कुठलीच नोटीस अथवा समन्स बजावलेली नाही. जेणेकरून जे लोक हे शौचालय वापरतात त्यांना आपल्या राहत्या घरात संडास बांधला येईल. वास्तविक, सोनार आळीत जवळ जवळ ९८ टक्के रहिवाशांकडे स्वत:चे टॉयलेट आहे मग हे शौचालय कोणासाठी? असाही प्रश्न निर्माण होतो. पालिकेने सार्व. शौचालय तोडून टाकावे व तेथे एखादे नाना-नानी पार्क बनवावे असे निवेदन सोनार आळीतील रहिवाशांनी दिलेले आहे. याचबरोबर नालेसफाई बाबतही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. एस.टी स्टँड कॉर्नर येथील नुरानी स्टोअर्सचे मालक अवेश मिन्नी यांनी याबाबत दिलेल्या माहितीवरून दरवर्षी या नाल्यातील पाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर येते आणि मोठ मोठे अपघात होतात. शिवाय दुर्गंधीमुळे आजाराला तोंड द्यावे लागते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: उभे राहून भर पावसात तुंबलेली गटार जेसीबीने मोकळी करण्यास सुरूवात केली व सिमेंटचे पाईप टाकून गटार दुरूस्ती केली त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांना थोडाफार दिलासा मिळालेला असून त्यांनी लोकमतचे आभार मानले आहेत. (वार्ताहर)