Join us

विद्याथ्र्याना प्रोत्साहनासाठी शक्कल

By admin | Updated: August 7, 2014 00:07 IST

रौप्य महोत्सवी ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विद्याथ्र्याचा सहभाग वाढावा, या उद्देशाने खाजगी शाळा व पालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

ठाणो : रौप्य महोत्सवी ठाणो महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत विद्याथ्र्याचा सहभाग वाढावा, या उद्देशाने खाजगी शाळा व पालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका शाळेतील 12 व 15 वर्ष वयोगटातील विजेत्या विद्याथ्र्याना प्रत्येकी पाच हजारांचे पारितोषिक दिले जाईल, असे सूतोवाच महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहेत.
महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात मंगळवारी खाजगी शाळेच्या आणि बुधवारी महापालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपायुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, ठाणो जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णकुमार कोळी, सचिव अशोक आहेर, एकनाथ पोवळे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत महापालिका शाळांमधील विद्याथ्र्याची संख्या मोठी असते. 
या विद्याथ्र्याना प्रोत्साहन मिळावे, यासाठी 12 व 15 वर्ष वयोगटांतील विद्याथ्र्यामध्ये प्रथम येणारा एक विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. शालेय मुलांना घेऊन येण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याने स्पर्धेबाबतच्या सूचना या वेळी शिक्षकांना देण्यात आल्या. 
या स्पर्धेची सुरुवात ही महापालिका मुख्यालयापासून होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणा:या विद्याथ्र्याना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये, यासाठी लवकरच मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गाची पाहणी केली जाणार असून त्या ठिकाणचे रस्ते दुरुस्त केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  (प्रतिनिधी)