नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमधील इंदिरानगर परिसरात अवैध दारू विक्री प्रकरणी मदनसिंग व तनवीर शेख यांना अटक करण्यात आली. दारूचा साठा व रोख रक्कम असा ३७ हजार ६२० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी या परिसरात धाड टाकण्यात आली. मदनसिंग व रिक्षाचालक तनवीर शेख यास मद्यविक्री करत असताना अटक केली. हे दोघे मुन्ना लामा याला दारू पुरविण्याचे काम करत होेते. लामा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
अवैध दारू विक्री : दोघांना अटक
By admin | Updated: May 8, 2015 23:23 IST