Join us

देवनारच्या आगीवर आयआयटीचा उतारा

By admin | Updated: February 6, 2016 03:28 IST

मिथेन वायूमुळे देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचरा वारंवार पेट घेत आहे़ तापमान वाढत गेल्यास हा धोका आणखी वाढेल़ त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी मिथेन

मुंबई : मिथेन वायूमुळे देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचरा वारंवार पेट घेत आहे़ तापमान वाढत गेल्यास हा धोका आणखी वाढेल़ त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी मिथेन वायू साठविण्याची तयारी आयआयटी मुंबईने दाखविली आहे़ याबाबतचा कृती आराखडा पालिका प्रशासनाला सादर करण्यात आला आहे़या आराखड्यानुसार डम्पिंग ग्राउंडवरील मिथेन वायू पाइपलाइनद्वारे साठवून हवेत सोडण्यात येईल़ हा उपाय केल्यास भविष्यात देवनार डम्पिंग ग्राउंडवर आग लागण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा करण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)...अन्यथा डम्पिंग ग्राउंड बंद करूमुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करीत असल्याचे लेखी आश्वासन आयुक्त अजय मेहता यांनी द्यावे; तसेच आगीच्या घटना रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, याबाबत माहिती द्या, अशा मागण्या स्थानिक नगरसेवक सिराज मोहम्मद यांनी केल्या आहेत़ आग आटोक्यात आणण्यासाठी आयआयटी मुंबईने दिलेला कृती आराखडा ३० दिवसांमध्ये अंमलात आणा, नाहीतर आम्हीच डम्पिंग ग्राउंड बंद करू, असा इशारा समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी दिला आहे़देवनार डम्पिंग ग्राउंडवर लागणाऱ्या आगीमुळे संपूर्ण पूर्व उपनगराचा जीव गुदमरत आहे़ चेंबूरमधून अनेक जण स्थलांतरित होऊ लागले आहेत़ शाळा बंद ठेवाव्या लागत आहेत. तरीही पालिका कारवाई करीत नसल्याने स्थानिक नगरसेवकांनी रफी नगर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे़ (प्रतिनिधी)