Join us  

क्यूएस रँकिंगमध्ये आयआयटी बॉम्बेची आगेकूच; मुंबई विद्यापीठ पहिल्या ५०० मध्येही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 1:01 AM

मुंबई : नावीन्यपूर्ण संशोधन आणि अभ्यासक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या आयआयटी बॉम्बेने पुन्हा एकदा क्यूएस रँकिंगच्या जागतिक क्रमवारीत आपले स्थान पक्के केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा क्रमवारीत सुधारणा करीत आयआयटी मुंबईने जगभरातील पहिल्या २०० विद्यापीठांमध्ये स्थान निश्चित केले आहे. गेल्या वर्षी १७९व्या क्रमांकावर असलेल्या आयआयटी बॉम्बेने यंदा १६२व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे मुंबई विद्यापीठ पहिल्या ५०० मध्येदेखील स्थान मिळवू शकलेले नाही.क्वाक्वारेली सायमंडस(क्यूएस) ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जगातील तसेच विविध खंडांतील विद्यापीठांचे रँकिंग करते. विद्यापीठांमध्ये होत असलेले संशोधन, तेथील सोयीसुविधा, लोकप्रियता अशा अनेक गोष्टी त्यासाठी गृहीत धरल्या जातात. भारताच्या रँकिंगमध्ये १०० पैकी ४८.२ गुण मिळवीत आयआयटी बॉम्बेने प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. यामध्ये अकॅडेमिक रेप्युटेशनमध्ये ५२.५, एम्प्लॉयर रेप्युटेशन ७२.९, फॅकल्टीसाठी ५४.१, फॅकल्टी पर स्टुडंट ४३.३, इंटरनॅशनल फॅकल्टीसाठी ४.४ तर इंटरनॅशनल स्टुडंटसाठी १.८ असे गुण आयआयटी बॉम्बेला मिळाले आहेत. आयआयटी इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सने १७०वा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या १६१मध्ये एकही भारतीय विद्यापीठ किंवा संस्था नाही. आयआयटीे बॉम्बेला मात्र १६२वा क्रमांक पटकाविण्यात यश आले आहे.२०१२ नंतर मानांकनातसतत घसरणक्यूएस रँकिंगमध्ये पहिल्या ५०० विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यात मुंबई विद्यापीठाला अपयश आले आहे. या रँकिंगमध्ये विविध टप्पे असून ८०० ते १००० या टप्प्यात मुंबई विद्यापीठ आहे. पुणे विद्यापीठ ७०० ते ८००च्या टप्प्यात आहे. २०१२ रोजी मुंबई विद्यापीठ ५५१-६००च्या टप्प्यात होते. मात्र, त्यानंतर त्याच्या मानांकनात सतत घसरण दिसून आली आहे.संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उत्तम कामगिरीमुळे रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. रँकिंगमधील सुधारणा ही आयआयटीच्या सर्व क्षेत्रातील प्रगती दर्शवते.- प्रा. देवांग खाखर,संचालक, आयआयटी बॉम्बे

टॅग्स :आयआयटी मुंबई