Join us  

आयआयटी बॉम्बेकडून ‘गेट २0२१’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 2:02 AM

संकेतस्थळ, माहितीपुस्तिकेचे अनावरण : फेब्रुवारीमध्ये २0२१ मध्ये परीक्षेची तयारी

मुंबई : देशपातळीवर आयोजित होणाऱ्या गेट परीक्षांचे नियोजन यंदा आयआयटी बॉम्बेमार्फत केले जात असून शुक्र वारी सायंकाळी २0२१ च्या गेट परीक्षेच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. देशातील सात आयआयटी आणि बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समार्फत या परीक्षांचे आयोजन दरवर्षी होत असते. नॅशनल कॉर्डीनेशन बोर्डामार्फत होणारी ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी ) स्वरूपात असते. शुक्रवारी आयआयटी बॉम्बेमार्फत २0२१ च्या गेट परीक्षेची माहितीपुस्तिका, पोस्टर आणि संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

यंदाची गेट परीक्षा ५, ६, ७, १२, १३, १४ फेब्रुवारी या तारखांना सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत पार पडणार आहे. तसेच यंदा एन्व्हायर्नमेंटल सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग तसेच ह्युमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्स या दोन नवीन विषयांचा समावेश असणार आहे. त्यामुळे एकूण विषयांची संख्या २७ असणार आहे. पेपर पॅटर्नमध्ये यंदा वस्तुनिष्ठ प्रश्नांचाच समावेश असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २0२0 प्रमाणे परीक्षेची पात्रता बदलण्यात आली असून पदवीचे तिसºया वर्षाचे शिक्षण घेणारा, शिक्षण घेतलेला विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरणार आहे. गेट २0२१ परीक्षेसाठी कोणतीही वयोमर्यादा ठेवण्यात आली नसून परीक्षेसाठीची नोंदणी विद्यार्थ्यांना १४ ते ३0 सप्टेंबरदरम्यान करायची असल्याचे आयआयटी बॉम्बेकडून कळविण्यात आले आहे. ही नोंदणी संपूर्णपणे आॅनलाइन पद्धतीने करता येणार आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव पाहता गेट २0२१ च्या वेळापत्रकात बदलही होऊ शकतो, असेही संस्थेकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबईआयआयटी मुंबई