Join us

कल्याण वाहतूक सुविधांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 13, 2014 23:05 IST

एकीकडे शहरात वाहतूककोंडीची जटील समस्या बनली असताना, दुसरीकडे सुविधांची बोंबाबोंब असल्याचे चित्र आहे.

कल्याण : एकीकडे शहरात वाहतूककोंडीची जटील समस्या बनली असताना, दुसरीकडे सुविधांची बोंबाबोंब असल्याचे चित्र आहे. वाहतूक शाखा आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्यात समन्वय नसल्याचा हा परिणाम असताना सुविधांबाबत महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला आह़े परंतु, त्याची दखल घेतली जात नसल्याचा दावा वाहतूक शाखेने केला आहे.
सद्य:स्थितीला कल्याण आरटीओ परिक्षेत्रत सुमारे सहा लाखांच्या आसपास वाहने आहेत. यातील निम्मी वाहने ही कल्याण-डोंबिवलीत आहेत. वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आह़े मात्र, त्यामानाने वाहतूक सुविधांची वानवा या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत आहे. कल्याण शहराचा विचार करता रेल्वे स्थानकातून बाहेर पडणा:या चाकरमानीवर्गाचा लोंढा, रस्त्यात बसणारे फेरीवाले, अस्ताव्यस्त उभ्या राहणा:या रिक्षा, परिणामी रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. 
रिक्षा स्टॅण्ड, टांगा स्टॅण्ड आणि बसस्थानक यांचे केंद्रीकरण रेल्वे स्थानक परिसरातच असल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडताना दिसते. आजघडीला शहरात एकही सिगAल यंत्रणा कार्यान्वित नाही. याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी केडीएमसीची आह़े वाहतूक नियमनाचे काम  पोलिसांचे आहे. 
सुविधांबाबत वाहतूक शाखेने  केडीएमसीला वारंवार पत्रव्यवहार केला आह़े सुविधा पुरविण्याकडे केडीएमसीचे होत असलेले दुर्लक्ष पाहता वाहतूक व्यवस्थेचे त्यांना कितपत गांभीर्य आहे, याची प्रचीती या ठिकाणी येत आहे. यात सुविधांअभावी वाहतूक नियमन करताना वाहतूक पोलिसांची मात्र चांगलीच कसरत होत आहे. 
यासंदर्भात लोकमतने केडीएमसीचे आयुक्त रामनाथ सोनवणो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नो कॉमेंट्स असे उत्तर देत बोलण्यास नकार दिला. (वार्ताहर)
 
वाहतूक नियमनासाठी 2क् वॉर्डन मिळणो, नो-पार्किग फलक, ङोब्रा क्रॉसिंग, सिगAल यंत्रणा कार्यान्वित करणो यासह अन्य सुविधांबाबत महापालिकेकडे 2क्13 पासून पत्रव्यवहार केला जात आह़े परंतु, याची दखल घेतली गेलेली नाही. रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करा, फेरीवाल्यांवर कारवाई करा, याकडेही पुरते दुर्लक्ष केले जात आहे.
- दिलीप सूर्यवंशी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कल्याण वाहतूक शाखा