Join us

परिवहन खात्याचे उरणकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 6, 2015 22:44 IST

उरण तालुक्यात ३४ ग्रामपंचायती आणि उरण नगरपरिषद क्षेत्र असून याठिकाणी नोकरीनिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

उरण : उरण तालुक्यात ३४ ग्रामपंचायती आणि उरण नगरपरिषद क्षेत्र असून याठिकाणी नोकरीनिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याठिकाणी परिवहन कार्यालयातर्फे महिन्यातून एका बुधवारी पनवेल कॅम्प घेण्यात येतो. मात्र नागरिकांची गर्दी पाहता हे कॅम्पचे प्रमाण अपुरे पडत महिन्यातून दोन किंवा तीनदा वाहनचालकांसाठी कॅम्प घेण्याची मागणी होत आहे. याबाबत पनवेल परिवहन कार्यालयात निवेदनही दिले आहे. उरणमध्ये महिन्यातून एक बुधवार उरणसाठी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये बदल करून महिन्यात दोन बुधवार किंवा सुट्टी असल्यास नियोजित वार देण्याची मागणी आहे.राज्यात परिवहन खात्यामध्ये एजंटना प्रवेशबंदी आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अधिकृत एजंट यांनाच परिवहन कार्यालयामध्ये दैनंदिन कामासाठी प्रवेश देण्याचे निर्देश दिल्यानंतर सर्वत्र राज्यभर होत असलेल्या नियमित गर्दीमुळे अनेकांना परिवहन कार्यालयातून काम पूर्ण न होताच रिकाम्या हाताने परतावे लागते.उरण तालुक्यात वेगवेगळी विकासकामे, प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे चाकरमानी नागरिकांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उरण न्यायालयाने अधिकृत एजंट, मोटार ट्रेनिंग स्कूल युनियन संघांना ट्रान्सपोर्ट असोसिएशन, स्वयंसेवी संस्थांची मान्यता प्राप्त प्रतिनिधींना प्रवेशाची मुभा दिली आहे. परिवहन विभागाने कॅम्पची संख्या वाढविल्यास, अधिकाधिक नागरिकांना लाभ घेता येणार आहे.