Join us

विद्युततारांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 7, 2014 00:31 IST

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता कार्यक्षेत्रात अनेक गावांमध्ये २५ ते ३० वर्षांपासून विद्युत तारांची दुरुस्ती झालेली नाही.

अंबाडी : महावितरणच्या कनिष्ठ अभियंता कार्यक्षेत्रात अनेक गावांमध्ये २५ ते ३० वर्षांपासून विद्युत तारांची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी तारा तुटण्याचे प्रमाण वाढून जीवितहानीची भीती आहे.महावितरणच्या अंबाडी कनिष्ठ अभियंता कार्यक्षेत्रात एकूण ५४ गावांचा समावेश होतो. ३० वर्षांच्या कालावधीत त्यापैकी केवळ बोटांवर मोजण्याइतक्या गावांतच तारांची दुरुस्ती करण्यात आली. बाकी सर्वत्र या विद्युतवाहिन्या लोंबकळलेल्या व जीर्ण अवस्थेत आहेत. दर आठवड्यास एक-दोन ठिकाणी तरी या विद्युततारा तुटलेल्या दिसतात. त्यांची अधिकृत नोंद महावितरणच्या तक्रार रजिस्टरमध्ये केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी विद्युततारा तुटल्याने एकतरी जीवितहानी होते. मात्र, वाडा तालुक्याच्या डी प्लस झोनमध्ये उत्तम सेवेची तत्परता दाखवणारी महावितरण कंपनी या गावांमधील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. सद्य:स्थितीत पावसाळ्यात या दुर्घटना अधिक वाढण्याची भीती आहे. तरीही महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. (वार्ताहर)