Join us  

‘जेट’बाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास विमानतळ करणार बंद, भारतीय कामगार सेनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 7:44 AM

जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याने या कंपनीमध्ये काम करणाऱ्या २२ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळेच १० मे रोजी होणाºया बोली प्रक्रियेमध्ये ‘जेट’बाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय कामगार सेनेतर्फे मुंबईतील दोन्ही विमानतळ बंद करण्यात येतील

मुंबई : जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याने या कंपनीमध्ये काम करणाऱ्या २२ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळेच १० मे रोजी होणाºया बोली प्रक्रियेमध्ये ‘जेट’बाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय कामगार सेनेतर्फे मुंबईतील दोन्ही विमानतळ बंद करण्यात येतील, असा इशारा भा.का.से.चे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. केंद्र सरकारने या प्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणीही करण्यात आली आहे.जेटप्रकरणी सकारात्मक तोडगा निघावा यासाठी शिवसेनेचे खासदार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहेत. बोली प्रक्रियेमध्ये बँकांनी स्वारस्य दाखविले नाही, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा व जेट एअरवेजसाठी बँकांना आर्थिक मदत करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.जेटच्या कर्मचाºयांचे थकीत वेतन पूर्णपणे मिळावे, त्यांचा रोजगार कायम ठेवावा, त्यांची सर्व देणी देण्यात यावीत व जेट एअरवेज पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भा. का. सेनेचे उपाध्यक्ष अजित साळवी, चिटणीस संजय कदम, संतोष चाळके, संतोष कदम, गोविंद राणे व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.जेट प्रशासनाला आमचे सहकार्य आहे, आम्ही त्यांच्याविरोधात नाही; मात्र कर्मचाºयांचे वेतन होणेही गरजेचे आहे. कर्मचाºयांना वाºयावर सोडू देणार नाही, असा निर्धार महाडिक यांनी या वेळी व्यक्त केला. जेट एअरवेजच्या अध्यक्षपदी नरेश गोयल कार्यरत असताना कर्मचाºयांचे वेतन होत होते, त्यामुळे या कठीण परिस्थितीत आम्ही जेट व गोयल यांच्या पाठीशी उभे राहिलो असल्याचे महाडिक म्हणाले.उद्या मुंबई विमानतळावर धरणेजेट एअरवेजची सेवा बंद झाल्याने कंपनीतील २२ हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यामुळेच याचे गांभीर्य लक्षात घेऊन जेटप्रकरणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी ८ मे रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती संजय कदम यांनी दिली.जेटच्या वैमानिकांना नोकरी मिळवण्यात तांत्रिक समस्यामुंबई : जेट एअरवेजची सेवा बंद झाल्याने जेटचे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे रोजगार मिळविण्यासाठी या कर्मचाºयांनी दुसºया हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये नोकरी शोधण्यास प्रारंभ केला आहे. यापैकी काही जणांना रोजगार मिळाला आहे. मात्र विदेशी हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये वैमानिक म्हणून काम करण्यासाठी प्रयत्न करणाºया वैमानिकांसमोर तांत्रिक समस्येमुळे संकट उभे राहिले आहे.जेटच्या काही वैमानिकांनी देशातील हवाई वाहतूक क्षेत्रासोबत विदेशातील हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये रोजगारासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र विदेशी कंपनीमध्ये वैमानिक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेले व नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे (डीजीसीए) देण्यात येणारे प्रमाणपत्र मिळण्यास अडथळे निर्माण झाल्याने त्यांच्यासमोर संकट उभे राहिले आहे. डीजीसीएने याबाबत वैमानिकांना सहकार्य करावे व आवश्यक प्रमाणपत्र त्वरित द्यावे जेणेकरून वैमानिकांना नवीन नोकरी मिळण्यासाठी साह्य होऊ शकेल,असे मत वैमानिकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :जेट एअरवेज