Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘महायुती न झाल्यास भाजपासोबत’

By admin | Updated: January 6, 2017 04:31 IST

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा व रिपब्लिकन पक्षाची महायुती न झाल्यास आम्ही भाजपासोबत जाऊ, असे प्रतिपादन आरपीआयचे

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा व रिपब्लिकन पक्षाची महायुती न झाल्यास आम्ही भाजपासोबत जाऊ, असे प्रतिपादन आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथील पत्रकार परिषदेत केले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान येथील आरपीआयच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, शिवसेना व भाजपाने एकत्रित यावे अशी आपली भूमिका आहे, त्यासाठी लवकरच दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहे. मात्र, सद्य:स्थितीत महायुती होण्याची शक्यता कमी आहे. महायुती झाल्यास आरपीआयला २५ ते ३० जागा हव्यात.