Join us

बेघरांना न्याय देण्यासाठी वेळ पडल्यास कायद्यात बदल करा: गोपाळ शेट्टी

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 26, 2024 19:03 IST

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय, कांदिवली पश्चिम येथे पंचशील प्रतिष्ठानने भारतीय संविधान गौरव दिन सोहळा आयोजित केला होता.

मनोहर कुंभेजकर, मुंबई-देशाच्या संविधानाला ७५ वर्षे झाली,मात्र आजही बेघरांची संख्या जास्त आहे.पहिल्या मजल्यावरील खाजगी जमिनीवर वर्षांवर्षे राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना बिल्डर घरे देत नाही.संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे.त्यामुळे बेघरांना न्याय देण्यासाठी वेळ पडल्यास कायद्यात बदल केला पाहिजे असे ठाम प्रतिपादन उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले.आज त्यांच्या बोरिवली पश्चिम लोकमान्य नगर येथील कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. 

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय , कांदिवली पश्चिम येथे पंचशील प्रतिष्ठानने भारतीय संविधान गौरव दिन सोहळा आयोजित केला होता. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सोबत जेष्ठ नेते भाई गिरकर,  आमदार योगेश सागर, आमदार मनिषा चौधरी, आमदार संजय उपाध्याय,  उत्तर मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले

डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला आहे. तो जेव्हा आपले एक मत देतो तेव्हा सरकार, पोलिस, न्यायालय,स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

आपण आज एक दिवस संविधान दिन साजरा करतो,मात्रडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अंगिकारा, आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता ज्यांनी तुम्हांला भरभरून मतदान करून निवडून दिले त्या मतदारांच्या अडचणी सोडवा, त्यांच्या जीवनात आशेचा किरण फुलवा असे आवाहन गोपाळ शेट्टी यांनी केले.

देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "संविधान दिवस" लोकसभेत साजरा करण्याची प्रथा सुरू केली.संसदेत यावर चर्चा झाली अशी माहिती त्यांनी दिली.

आज ही टाऊन प्लॅनिंग अँक्ट मध्ये अनेक वर्षे प्रकरणे न्यायालयात प्रलंबित राहतात. त्यामुळे अनेक बेघर निवऱ्यापासून वंचित आहेत.बोरिवली पश्चिम शिंपोली येथे जमीन मालकाच्या जागेचा वाद न्यायालयात २००८ पासून सुरू आहे.१५० वेळा न्यायालयात सुनावणी झाली,परंतू अजूनही निकाल लागलेला नाही.२००८ पासून येथील नागरिक उद्यानापासून वंचित आहे.त्यामुळे सदर प्रकरणे लवकर मार्गी लागून बघरांना घरे आणि नागरी सुविधा लवकर मिळाल्या पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :गोपाळ शेट्टी