Join us

आरक्षण न दिल्यास मंत्र्यांच्या गाड्या फोडू!

By admin | Updated: March 24, 2015 02:33 IST

: ‘अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या नाहीत तर दिसेल तिथे मंत्र्यांच्या गाड्या फोडू’, असा इशारा माजी आमदार प्रकाश (अण्णा) शेंडगे यांनी दिला आहे.

मुंबई : ‘अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या नाहीत तर दिसेल तिथे मंत्र्यांच्या गाड्या फोडू’, असा इशारा माजी आमदार प्रकाश (अण्णा) शेंडगे यांनी दिला आहे. सोमवारी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने काढलेल्या मोर्चाला उद्देशून शेंडगे बोलत होते. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर हजेरी लावली.विधान परिषदेत खडाजंगी... धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाली. स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी करीत विराधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकूब करावे लागले. सभागृह कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. राज्य सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही. सभागृहाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून धनगर आरक्षणावर चर्चा करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.