Join us

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:07 IST

धनंजय मुंडे कथित बलात्कार प्रकरणतुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेतेतरुणीचे ट्विट : धनंजय मुंडे कथित ...

धनंजय मुंडे कथित बलात्कार प्रकरण

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते

तरुणीचे ट्विट : धनंजय मुंडे कथित बलात्कार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली असून तक्रारदार तरुणीही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप तिने फेटाळले आहेत. तसेच ‘तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते’, असे ट्विट तिने केले आहे.

तक्रारदार तरुणीने केलेल्या ट्विटमध्ये, मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का आले नाहीत? मला हटविण्यासाठी सगळे जण एकत्र येत आहेत. मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. एक काम करा, तुम्ही सर्वांनी मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते, असे नमूद करण्यात आले आहे.

* आज जबाब नोंदवला नाही

तरुणीने गुरुवारी सव्वाचार तासांच्या चौकशीअंती अर्धवट जबाब नोंदवून, शुक्रवारी उर्वरित जबाबासाठी हजर राहणार असल्याचे सांगितले हाेते. मात्र आता शुक्रवारऐवजी शनिवारी हजर राहणार असल्याचे तिने सांगितले.

* तरुणीच्या वकिलांना धमकीचे कॉल

तक्रारदार तरुणीने शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले हाेते. मात्र काही कारणास्तव तरुणी हजर राहिली नाही. मात्र तिचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत तरुणीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले. तसेच आपल्याला धमकीचे कॉल येत असल्याचे सांगितले.

.........................................