मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉल) शिक्षण घेणा:या मागासवर्गीय विद्याथ्र्याची फ्रीशिप समाजकल्याण विभागाने बंद केली आहे. तर हा आदेश मागे न घेतल्यास विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन करेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
विद्यापीठाच्या आयडॉलमधून दरवर्षी हजारो गोर गरीब विद्यार्थी काम करुन शिक्षण घेतात. मागासवर्गीय विद्याथ्र्याना गेल्या अनेक वर्षापासून समाजकल्याण विभागामार्फत फ्रीशिप देण्यात येत होती. मात्र, ती यंदापासून बंद करण्यात आल्याने विद्यार्थी भारती संघटनेने याचा तीव्र विरोध केला आहे. मागासवर्गीय विद्याथ्र्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रय} करण्याऐवजी त्यांचा फ्रीशिपचा लाभ काढून घेतल्याने अनेक विद्याथ्र्याना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. या फ्रीशिपचा लाभ द्यावा, अन्यथा आंदोलनचा इशारा संघटनेच्या कार्याध्यक्षा विजेता भोनकर यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)