Join us

मूर्ती लहान, कीर्ती महान

By admin | Updated: January 20, 2016 02:20 IST

मोहित दळवी. वय १२ वर्षे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या या मुलाने जिवाची पर्वा न करता नऊ वर्षांच्या कृष्णा पाष्टे या चिमुरडीचे प्राण वाचविले

मुंबई : मोहित दळवी. वय १२ वर्षे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या या मुलाने जिवाची पर्वा न करता नऊ वर्षांच्या कृष्णा पाष्टे या चिमुरडीचे प्राण वाचविले. वाळकेश्वर येथे राहणाऱ्या मोहितच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वाळकेश्वरच्या घरी तो आत्या डिंपल दळवी आणि मोठा भाऊ रूपेश दळवीसोबत राहतो. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाल्यानंतर मोहितचे हे धाडस प्रकाशात आले. मोहित वाळकेश्वरच्या महापालिका शाळेत शिकत आहे. त्याचा मोठा भाऊ रूपेश हा लीलावती कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत आहे. मोहितची आत्या घरकाम करून तुटपुंज्या पगारात या दोन्ही भावांचा सांभाळ करते. ‘महिन्याला आत्याला केवळ दोन हजार रुपयांच्या आसपास कमाई होते. खर्च भागवताना नाकीनऊ येतात. आम्हा दोघांच्या शिक्षणासाठी आत्याची नेहमीच धडपड सुरू असते,’ असे मोहितचा मोठा भाऊ रूपेशने सांगितले. (प्रतिनिधी)