Join us

44.61 लाख मतदारांकडे ओळखपत्र

By admin | Updated: September 16, 2014 23:21 IST

राज्यात सर्वाधिक 18 विधानसभा मतदार संघ असलेल्या ठाणो जिल्ह्यात 59 लाख एक हजार 732 मतदारांची सद्यस्थितीला नोंदणी करण्यात आली आहे.

सुरेश लोखंडे - ठाणो 
राज्यात सर्वाधिक 18 विधानसभा मतदार संघ असलेल्या ठाणो जिल्ह्यात 59 लाख एक हजार 732 मतदारांची सद्यस्थितीला नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी सुमारे 44 लाख 61 हजार दहा मतदारांना मतदार ओळखपत्रंचे वाटप करण्यात आल्याचा दावा निवडणूक विभागाने केला आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने 31 जुलैर्पयत सुमारे 59 लाख एक हजार 732 मतदार निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी सुमारे 75.59 टक्के मतदारांकडे मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले आहेत. यानंतर सुमारे दीड महिन्यांपासून स्वीकारलेल्या मतदार नोंदणी अर्जाची छाननी करून त्यात पात्र ठरणा:यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क दिला जाणार आहे. यामुळे वाढीव मतदार यादी 25 सप्टेंबर्पयत तयार करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी लोकमतला सांगितले. 
सद्यस्थितीला जिल्ह्यात 32 लाख 44 हजार पुरूष मतदारांसह 26 लाख 57 हजार 5क्9 स्त्री मतदारांची नोंद झाली आहे. यापैकी 24 लाख 49 हजार 21क् पुरूषांकडे मतदार ओळखपत्र असून 2क् लाख 11 हजार 64क् महिलांना मतदार ओळखपत्रंचे वाटप करण्यात आले आहे.  याशिवाय आतार्पयत सुमारे 16क् तृतीय पंथीयांची मतदार म्हणून नोंदणी केलेली असून त्यांचे देखील मतदार ओळखपत्र तयार करण्यात  आले आहेत. मतदार ओळखपत्र असलेल्या बहुतांशी मतदारांचे  यादीत देखील छायाचित्र आहे. यामुळे योग्य व्यक्तीला त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार 
असून बोगस मतदानाला आळा बसणार आहे. 
सध्या केवळ 14 लाख 4क् हजार 722 मतदारांकडे मतदार ओळखपत्र नाही. पण मतदानाच्या दिवसार्पयत यातील बहुतांशी मतदारांना ओळखपत्र वाटप होण्याची शक्यता आहे. यासाठी विविध मोहिमांव्दारे सुमारे 43 लाख 2क् हजार 289 मतदारांच्या घरोघर जावून किंवा शिबिराव्दारे फोटो गोळा करून ओळखपत्र तयार करणो शक्य झाले आहे. 
 
मतदारसंघनिहाय ओळखपत्र असलेले मतदार 
विधानसभामतदार ओळखपत्र
 भिवंडी ग्रा.259935234449
शहापूर234131215732
भिवंडी वे.25क्481196941
भिवंडी ई.26987621क्223
कल्याण वे.387634257576
मुरबाड35क्253282338
अंबरनाथ33972क्264643
उल्हासनगर32442क्198781
कल्याण इ.3क्78672क्6125
 
विधानसभामतदार ओळखपत्र
डोंबिवली336123218114
कल्याण ग्रा.345क्1424क्33क्
मीरा भाईंदर3546613क्3373
ओवळा माजीवड361223278242
कोपरी पाचपा.34626127क्क्41
ठाणो318519263511
मुंब्रा कळवा33778क्261183
ऐरोली4क्144क्291431
बेलापूर376394267979
 
16क् तृतीय पंथीय मतदार :  आतार्पयत 16क् तृतीय पंथीयांची मतदार म्हणून नोंद करण्यात आली असून त्यांना ओळखपत्र देखील वाटप करण्यात आले आहे. यात काहींची नव्याने वाढ होण्याची शक्यता आहे. कल्याण पूर्व मतदार संघात 55 तर कल्याण ग्रामीणमध्ये 28, उल्हासनगरमध्ये 24, एग्ेरोलीत 21, अंबरनाथमध्ये 15,  मुरबाडमध्ये सात,  मीरा-भाईंदरमध्ये पाच, कोपरी-पाचपाखाडीमध्ये  दोन आणि बेलापूर मतदार संघात एका तृतीयपंथीयाची नोंद केली आहे.