Join us

आयसीएसई मंडळाच्या दहावी, बारावीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:06 IST

मुंबईआयसीएसई मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारायची आहे, ...

मुंबई

आयसीएसई मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारायची आहे, त्यांच्यासाठी श्रेणीसुधार परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक मंडळाकडून जारी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत १ ऑगस्ट रोजी संपणार होती. विद्यार्थी ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे आयसीएसई दहावीत जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत; पण इंग्रजी आणि तीन अन्य विषयात उत्तीर्ण आहेत, तसेच आयएससी म्हणजेच बारावीचे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत; पण इंग्रजी आणि अन्य दोन विषयांत उत्तीर्ण आहेत ते पुरवणी परीक्षा देऊ शकतात. श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षा १६ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहेत.