Join us

‘त्या’ दृश्याला ‘आयएमए’चा विरोध

By admin | Updated: May 11, 2015 04:28 IST

लहानशा कारणांवरूनही रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे डॉक्टरांची प्रतिमा डागाळत चालली आहे.

मुंबई : लहानशा कारणांवरूनही रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे डॉक्टरांची प्रतिमा डागाळत चालली आहे. यातच गब्बर चित्रपटात डॉक्टरांविषयी चुकीचे चित्रण केल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे असोसिएशनचे सरचिटणीस डॉ.के.के.अग्रवाल यांनी सांगितले. गब्बर या चित्रपटातील एका दृश्यात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही डॉक्टर तसे जाहीर करत नाहीत. उपचार सुरू आहेत असे सांगून पैसे घेतात, असे दृष्य दाखवण्यात आले. हे अत्यंत चुकीचे आहे. डॉक्टर हे रुग्णांचा जीव वाचावा म्हणून त्यांच्यावर उपचार करीत असतात. दिवसरात्र मेहनत करून रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. तरीही डॉक्टरांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करणे योग्य नाही. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या दृष्याचा निषेध म्हणून आयएमएने सेन्सॉर बोर्ड, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला चार दिवसांआधी पत्र लिहीले होते. डॉक्टरांची प्रतिमा मलिन करणारे हे दृष्य असून याची गंभीर दखल घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण, चार दिवस आयएमएला कोणाकडूनही उत्तर आलेले नाही. ---------‘गब्बर इज बॅक’ या चित्रपटात डॉक्टरांविषयीची चुकीचे चित्रण केल्याच्या निषेर्धात इंडियन मेडिकल असोसिएशनने अभिनेता अक्षय कुमार आणि संजयलीला भन्साली यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आयएमए सदस्यांनी या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा असे सदस्यांना कळवण्यात आले आहे.