Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रीती-नेस यांच्यातील वाद कळला नाही

By admin | Updated: June 27, 2014 01:00 IST

अभिनेत्री प्रीती ङिांटा विनयभंगप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी आज जय कनोजिया या साक्षीदाराचा जबाब नोंदविला. जयचे नाव प्रीतीने मरिन ड्राइव्ह पोलिसांना दिले होते.

मुंबई : अभिनेत्री प्रीती ङिांटा विनयभंगप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी आज जय कनोजिया या साक्षीदाराचा जबाब नोंदविला. जयचे नाव प्रीतीने मरिन ड्राइव्ह पोलिसांना दिले होते. त्याने आपल्या जबाबात नेस यांनी प्रीतीला हाताला धरून खेचल्याचे मी पाहिले. मात्र त्यांच्यात नेमके काय बोलणो सुरू होते, त्या बोलण्यातला नेमका मुद्दा काय होता हे मी ऐकू शकलो नाही. कारण स्टेडियममध्ये खूप गाेंगाट होता, असे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रीतीने पुरवणी जबाबात दिलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. त्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या कर्मचारी महिलेचा सहभाग आहे. तारा असे तिचे नाव आहे. सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या नेस यांच्या मातोo्री आणि अन्य नातेवाइकांना आसनव्यवस्था नव्हती. त्याबाबत नेस यांनी तारा यांच्याकडे चौकशी केली. या वेळी ते तारा यांना ओरडले होते. याशिवाय पोलीस पंजाब संघाचे अन्य मालक रोहित बर्मन यांचाही जबाब नोंदविण्याची शक्यता आहे. बर्मन हे स्वतंत्र साक्षीदार असल्याने त्यांचा जबाब या प्रकरणी महत्त्वाचा ठरू शकतो, असे पोलिसांना वाटते.
दरम्यान, अभिनेत्री प्रीती ङिांटा विनयभंगप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस आरोपी नेस वाडिया यांच्या बाजूने पुढे आलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेणार आहेत.
नेस वाडिया यांनीही 3क् मे रोजी वानखेडे स्टेडियमच्या गरवारे स्टॅण्डमध्ये उपस्थित काहींची नावे सादर केली आहेत. या सर्वाचे जबाब नोंदवल्यावर दोन्ही बाजू तपासून पुढील कारवाई केली जाईल, असे तपासाशी संबंधित अधिका:याने सांगितले. (प्रतिनिधी)