Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करणारा पती अखेर जेरबंद

By admin | Updated: September 12, 2014 23:47 IST

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय धरुन रागाच्या भरात तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करणा-या पतीला गुन्हे अन्वेषण युनिट-२ व नवीन पनवेल पोलिसांनी काही तासांतच गजाआड केले.

पनवेल : पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय धरुन रागाच्या भरात तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करणा-या  पतीला गुन्हे अन्वेषण युनिट-२ व नवीन पनवेल पोलिसांनी काही तासांतच गजाआड केले. तालुक्यातील रोडपाली येथील साईराज बिल्डिंग या ठिकाणी राहणारा सागर भिखुभाई त्रापसिया (२५) याचे सोनम सागर त्रापसिया (२४) हिच्याबरोबर लग्न झाले होते. सागर हा एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी सुपरवायझरचे काम करत असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात खटके उडत होते. यातच त्याला आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. या संदर्भात त्याने पत्नीला ताकीद देवूनसुध्दा ती ऐकत नसल्याने अखेरीस त्याने पत्नीला पांढऱ्या रंगाच्या सँट्रो गाडीतून तालुक्यातील लोणीवली माचीप्रबळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वडाच्या वळणावर नेले. तेथे तिच्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिला तेथेच टाकून तो पसार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.एकाने याबाबतची माहिती नवीन पनवेल पोलिसांना दिली. त्यानुसार गुन्हे अन्वेषण युनिट-२ चे पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ, पोलीस उपनिरीक्षक संतोष भोसले, नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस निरीक्षक हिवाळे, पोलीस उपनिरीक्षक सावंत, पोलीस हवालदार संजय कांबळे, सचिन पवार, साळुंखे, परेश म्हात्रे व त्यांचे पथक घटनास्थळी गेले व अधिक तपासात त्यांना त्या महिलेची हत्या ही तिच्या पतीने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.