Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील शिवीगाळ केल्यामुळे पतीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:44 IST

मुलासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अश्लील शिवीगाळ केल्यामुळे, पत्नीनेच पतीची हत्या केल्याची घटना सोमवारी घडली.

मुंबई : मुलासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून अश्लील शिवीगाळ केल्यामुळे, पत्नीनेच पतीची हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी पत्नी सरिता अर्जुन पासिकर (४३) हिला अटक केली आहे.काळाचौकी येथील कात्रीदेवी सोसायटीत सरिता या पती आणि दोन मुलांसोबत राहतात. पतीने दारूच्या व्यसनामुळे त्याने घरखर्च देणे बंद केले. घरातील सर्व दागिने विकले. गेल्या चार वर्षांपासून पत्नीसोबत शारीरिक संबंधही तोडले. त्याने पत्नीचे मुलासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करत, तिला अश्लील शिवीगाळ सुरू केली. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास याच वादातून त्याने पत्नीला शिवीगाळ केली. रागात तिने लाकडी स्टंपने मारहाण सुरू केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. अर्जुन याचा मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात धाडला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून, पत्नीला अटक केल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप उगळे यांनी दिली.