Join us

मनोरुग्ण पत्नीकडून पतीची हत्या

By admin | Updated: December 17, 2014 09:58 IST

मनोरुग्ण पत्नीने पतीच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करीत त्याची हत्या केल्याची घटना गोवंडी येथे घडली.

मुंबई : मनोरुग्ण पत्नीने पतीच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करीत त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी गोवंडी येथे घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी पत्नीवर हत्येचा गुन्हा दाखल करीत तिला अटक केली आहे.गोवंडीच्या इंडियन ऑइल नगर येथे मृत देबासीस सेन (५६) हे त्यांच्या ४९ वर्षीय पत्नीसह राहतात. पत्नीला पाच वर्षांपासून स्क्रिझोफेनिया हा मानसिक आजार असल्याने त्यांनी तिच्यावर उपचार सुरू होते. अधूनमधून तिला झटके येत असल्याने देबासीस तिला एकटीला सोडून कुठेही बाहेर जात नव्हते. सोमवारी सकाळी देखील दोघेही झोपलेले असताना या महिलेला अचानक झटका आला. या वेळी तिने घरातील लोखंडी रॉडने पतीवर हल्ला केला. देबासीस यांच्या डोक्यावर, मानेवर आणि हातांवर गंभीर जखमा झाल्याने त्यांचा घरातच मृत्यू झाला. काही वेळानंतर याच परिसरात राहणारी त्यांची मोठी मुलगी घरी परतली. तिच्या हा प्रकार लक्षात येताच तिने देबासीस यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वी ते मृत झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)