Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या

By admin | Updated: July 21, 2015 04:02 IST

प्रियकरासोबत मिळून पतीची गळा आवळून हत्या करणाऱ्या एका महिलेला रविवारी साकीनाका पोलिसांनी अटक केली. ही महिला पेशाने शिक्षिका

मुंबई : प्रियकरासोबत मिळून पतीची गळा आवळून हत्या करणाऱ्या एका महिलेला रविवारी साकीनाका पोलिसांनी अटक केली. ही महिला पेशाने शिक्षिका असून तिच्या फरार प्रियकराचा शोध पोलीस घेत आहेत. रिबा लेवेनस्टोन (३६) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. ती साकीनाक्याच्या जरीमरी परिसरात असलेल्या राधाकृष्ण चाळीत पती बाबू आणि दोन मुलांसोबत राहत होती. या दोघांच्या लग्नाला अठरा वर्षे झाली. मात्र बाबू तिला नेहमी शिवीगाळ करून मारझोड करत होता. त्यामुळे ती त्रासली होती. त्यातच गेल्या वर्षभरापासून तिचे अजय नावाच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तीन महिन्यांपूर्वीच एका प्राथमिक शाळेत शिक्षिकेचे काम करणाऱ्या रिबाचे १६ जुलै रोजीदेखील बाबूशी भांडण झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी पहाटे रिबाने अजयला घरी बोलावत बाबूचा काटा काढला. रिबाला अटक केली असून तिच्या साथीदाराचा शोध आम्ही घेत असल्याची माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी दिली. (प्रतिनिधी)