करिश्मा कपूर गेल्या काही वर्षापासून पती संजय कपूरपासून वेगळी राहत आहे, पण त्यांची मुलं सध्या करिश्मासोबतच राहत आहेत. संजयने या दोन मुलांचा ताबा मिळावा यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुरुवातीला त्याने नऊ वर्षाची मुलगी समायराच्या कस्टडीसाठी अर्ज केला होता. आता चार वर्षाचा मुलगा कियानसाठी त्याने याचिका दाखल केली आहे. सूत्रंनुसार संजयला हे प्रकरण कोर्टाबाहेरच सोडवायचे आहे; पण करिश्मा अडून बसल्याने त्याला हे पाऊल उचलावे लागले.
पतीने करिश्माला खेचले कोर्टात
By admin | Updated: June 5, 2014 01:03 IST