Join us

पती आणि सासूने हुंडयासाठी माझा छळ केला - करिष्मा कपूर

By admin | Updated: February 28, 2016 10:23 IST

करिष्माने मुंबईतील खार पोलिस स्थानकात पती संजय कपूर विरोधात हुंडयासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २८ - बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरच्या वैवाहिक आयुष्यातील वाद विकोपाला गेला आहे. करिष्माने मुंबईतील खार पोलिस स्थानकात पती संजय कपूर विरोधात हुंडयासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मुंबई पोलिस लवकरच संजय कपूरला चौकशीसाठी बोलवू शकतात. 
घटस्फोट आणि मुलांचा ताबा मिळवण्यासाठी दोघांमध्ये आधीपासूनच कायदेशीर लढाई सुरु आहे. करिष्माच्यावतीने तिच्या वकिलांनी पोलिसांना एक अर्ज दिला. त्यात करिष्माने पती संजय कपूरवर शारीरीक छळ केल्याचा आरोप केला आहे. 
आम्ही तक्रार दाखल केली असून, आरोपांच्या आधारावर चौकशी करु. येत्या आठवडयात संजय आणि त्याच्या आईची चौकशी करु असे खार पोलिस स्थानकातील अधिका-याने सांगितले. २०१२-१३ मध्ये या दोघांनी मिळून आपला छळ केला असे करिष्माने तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी करिष्मा त्यांच्याबरोबर खार येथे रहात होती. चौकशीपूर्वी कोणालाही अटक करणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.