Join us
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत चक्रीवादळ

By admin | Updated: June 24, 2015 00:56 IST

५० लाखांचे नुकसान : नेमळेत महिला जखमी, सावंतवाडीत चौघेजण थोडक्यात बचावले

सावंतवाडी : सावंतवाडी शहरासह परिसराला मंगळवारी जोरदार चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये सुमारे ५० लाख रुपयांची हानी झाली आहे, तर नेमळे येथे घरावर झाड पडल्याने एक महिला जखमी झाली आहे. सावंतवाडीत गॅरेजवर झाड पडल्याने चौघेजण थोडक्यात बचावले. वादळाची तीव्रता एवढी मोठी होती की, अर्ध्या तासात तब्बल ५० ते ६० घरांवर लहान मोठी झाडे पडून नुकसान झाले, तर दहा ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळाने विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या वादळाने सावंतवाडी चांगलीच हादरून गेली आहे. नागरिक भेदरलेल्या अवस्थेत आहेत.सावंतवाडी शहरासह माजगाव, चराठा, नेमळे, मळगाव, तळवडे भागात मोठ्या प्रमाणात मंगळवारी दुपारी वादळ झाले. वादळाने मुंबई-गोवा महामार्गासह शहराच्या आतील रस्ते विजेचे खांब व झाडे कोसळून वाहतुकीसाठी बंद झाले होते. वादळाची तीव्रता सावंतवाडीत सर्वाधिक होती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सहाआसनी रिक्षा थांब्यानजीक असलेल्या गॅरेज समोरचे जुने झाड उन्मळून चार दुकानावर कोसळले. तसेच या झाडाचे भले मोठे मूळ नियाकत पडवेकर यांच्या गॅरेजमध्ये घुसले. गॅरेजमध्ये पंक्चर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या होत्या, तसेच काही ग्राहकही उभे होते; मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.तसेच पडवेकर यांची दुचाकीही या झाडाखाली गाडली गेली.हे झाड कोसळल्याने मुख्य बाजारपेठेतीलसंजू बांदेकर, आनंद आळवे यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेवगी कोल्ड्रिंक्स हाऊसच्या मागच्या बाजूला झाडाचा काही भाग कोसळला,संजू बांदेकर, आनंद आळवे यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेवगी कोल्ड्रिंक्स हाऊसच्या मागच्या बाजूला झाडाचा काही भाग कोसळला, तर शहरातील ओंकार तुळसुलकर यांच्या घरावर झाड कोसळले असून, सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. तर प्रमोद वाडकर, संतोष पई, नितीन कारेकर व माजगाव येथील दत्तगुरू भोगण, साधले मेस तसेच सबनीसवाडा, बाहेरचावाडा, उभाबाजार खासकीलवाडा, भटवाडी, झिरंगवाडी, माजगाव गरड, आदी ठिकाणी जोरदार चक्रीवादळ झाले असून, त्यातही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कारागृहानजीक झाड कोसळून विद्युत खांब कोसळले, तर चराठा येथे ही विजेचा खांब कोसळून गाव पूर्णत: अंधारात होते. सावंतवाडीतील विद्युत प्रवाह रात्रीउशिरा सुरू करण्यात आला आहे. मात्र, या चक्रीवादळात विद्युत विभागाचे मोठे नुकसान झाले असून, तालुक्यात दहा ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत.नेमळेत महिला जखमीतालुक्यात बहुतांश गावात चक्रीवादळ झाले असून, नेमळे येथे केशव माडकर यांच्या पाटकर वाडीतील घरावर माडाचे झाड कोसळून त्यांची सून मानसी माडकर जखमी झाली. खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. माडाचे झाड रात्रीच्या सुमारास कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची नोंद महसूल विभागात उशिरापर्यंत करण्यात आली नव्हती. तळवडे : तळवडे गावालाही चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, गावातील विद्युत खांब कोसळले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते; पण उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. तळवडेबरोबरच होडावडा येथे विद्युत प्रवाह खंडित झाला होता. मळगावमध्ये काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात घरावर झाडे पडली असून, उशिरापर्यंत या घटनेचा पंचनामा झाला नव्हता. (प्रतिनिधी)अनेक गावांत नुकसानसावंतवाडी शहराला जसा चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला तसेच परिसरातील गावांनाही बसला असून, अनेक गावांमध्ये घरांवर झाड कोसळण्याचे प्रकार घडले होते; पण याची नोंद महसूल दप्तरी झाली नव्हती.काही क्षणांत होत्याचे नव्हतेसावंतवाडी तालुक्यात चक्रीवादळाने काही क्षणांत होत्याचे नव्हते केले. तसाच प्रकार गावागावांमध्ये घडला आहे. वादळाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी होते.