Join us
Daily Top 2Weekly Top 5

जोगेश्वरीत दीड लाखाचा एमडी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 05:51 IST

लाखो रुपयांच्या एमडीसह विक्रेत्याला जोगेश्वरी परिसरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या कक्ष १० ने बुधवारी अटक केली.

मुंबई : लाखो रुपयांच्या एमडीसह विक्रेत्याला जोगेश्वरी परिसरात गुन्हे अन्वेषण विभागाच्या कक्ष १० ने बुधवारी अटक केली. त्याच्याविरोधात जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू आहे.झाकीर शरीफुल्लह सय्यद (३०) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात काही लोक अमलीपदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष १० चे पोलीस निरीक्षक भोईर यांना मिळाली होती. त्यानुसार या कक्षाचे प्रमुख श्रीमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भोईर यांनी पोलीस निरीक्षक पोखरकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, डोपेवाड आणि पथकाने बुधवारी रुग्णालय परिसरात बुधवारी रात्री सापळा रचला व सय्यदला रंगेहाथ ताब्यात घेतले.