Join us  

जागतिक तापमानवाढीस ‘मानवी चुका’ जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:23 AM

वारंवार बदलत्या हवामानामुळे नागरिकांकडून ‘आज मौसम बडा बेईमान है...’ असे मिश्किलपणे म्हटले जाते.

- महेश चेमटे मुंबई : वारंवार बदलत्या हवामानामुळे नागरिकांकडून ‘आज मौसम बडा बेईमान है...’ असे मिश्किलपणे म्हटले जाते. मात्र देशातील तब्बल ५३ टक्के नागरिकांनी जागतिक तापमान वाढीस ‘मानवी चुका’ जबाबदार असल्याचे मान्य केले आहे. २० वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानांमध्ये १५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.वर्ल्ड बँक आणि युनायटेड नेशन आॅफिस फॉर डिझॅस्टर रिस्क रिडक्शन (यूएनआयएसडीआर) यांच्या अभ्यास अहवालानूसार, नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका बसलेल्या जगातील ‘टॉप टेन’ शहरांमध्ये भारताचा चौथ्या क्रमांक आहे. देशात विशेषत: पुरामुळे तब्बल ७९.५ बिलियन डॉलरचा फटका बसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तींमध्ये दुष्काळ, पूर, भूकंप, त्सुनामी, वादळ आणि उच्च तापमान या कारणांचा समावेश आहे.१९७८ ते १९९७ या २० वर्षात जगात नैसर्गिक आपत्तींमुळे ८९५ बिलियन यू. एस. डॉलरचे नुकसान झाले होते. १९९८ ते २०१७ या काळात नैसर्गिक आपत्तींमुळे होणारा जगातीलखर्च तब्बल २.२५ ट्रिलियन यू.एस.डॉलरपर्यंत पोहचला आहे. परिणामी २० वर्षांच्या काळात नैसर्गिक आपत्तींमुळे होणाºया नूकसान खर्चात तब्बल १५१ टक्क्यांनी वाढ नोंदवल्याचे ही अहवालातून स्पष्ट होत आहे.>तंत्रज्ञानाच्या युगात जगताना निसर्गाच्या साखळीचा विसर पडत आहे. बेलगाम उद्योगनिर्मिती, वीजनिर्मिती, रासायनिक खतांचा बेसूमार वापर यांमुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. शिवाय विकासाच्या नावाखाली बेसूमार जंगलतोड थांबवणे गरजेचे असून आता उद्योगकेंद्री विचारांपेक्षा पृथ्वीकेंद्री विचार करणे गरजेचे आहे. जगातील आणि भारतातील हवामानाची स्थिती पाहता मानवाला ‘जीवन’ हवे की ‘जीवनशैली’हवी याचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट होत आहे. - गिरीश राऊत, पर्यावरण तज्ज्ञ

टॅग्स :तापमान