डोंबिवली : येथील टिळकनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वसंतोत्सव-२०१५’ या संगीत महोत्सवाची सांगता रविवारी झाली. १ ते ३ मे असे तीन दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाला डोंबिवलीकरांनी तुडुंब गर्दी केली होती. वातावरणातील प्रचंड उकाड्यातही संगीताच्या गारव्याने डोंबिवलीकर रसिक तृप्त झाल्याचे समारोपाच्या दिवशी प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसून आले.शुभारंभाच्या पहिल्या पुष्पात मंजुषा पाटील-कुलकर्णी, आनंद भाटे यांच्या नाट्यसंगीत गायनाचा कार्यक्रम झाला. त्यांनी क्षण आला भाग्याचा, चांद माझा हसरा, हे सुरांनो चंद्र व्हा, सजना का धरिला परदेस, श्रीरंगा कमला कांता... अशी एकापेक्षा एक नाट्यपदे सादर केली, तर भाटे यांनी देहाता शरणागता, वद जाऊ कुणाला शरण, दान करी रे, जोहार मायबाप जोहार... अशी नाट्यपदे सादर केली. दुसऱ्या पुष्पात गीतकार गुलजार यांच्या गीतांवरील कार्यक्र म ‘दिल ढूंढता है’ या संदीप मयेकर यांचे संयोजन असलेला कार्यक्रमात मुसाफिर हू यारो, बोले रे पपी हरा, मोरा गोरा अंग लई के, आनेवाला कल, मेरा कुछ सामान, एक अकेला इस शहर में, मासूममधील तुझसे नाराज नही, नाम गुम जाये गा, आज कल पाव जमी पर, पिया बावरी, वो शाम कुछ अजीब थी, यारा सिलीसिली, ओ माझी रे, बेचारा दिल क्या करे, दिल ढूंढता है फिर वोही, चप्पा चप्पा चरखा चले आणि जहाँ पे सवेरा हो... अशा एकापेक्षा एक गुलजारजींच्या अजरामर गीतांनी रसिक भारावून गेले.समारोपाला संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि श्रुती भावे व्हायोलिन, वरद कठापूरकर बासरी यांच्या जुगलबंदीचा बहारदार कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना तृप्त करून गेला. त्यांना साथ करण्यासाठी तबल्यावर स्वप्नील भिसे, ढोलकीवर प्रभाकर मोसंबकर, ड्रमवर विजय शिवलकर आणि गिटारवर अमोघ दांडेकर यांची मोलाची साथ लाभली. या कार्यक्र माची सुरुवात केसरिया बालमा ने झाली. त्यानंतर, तिने चुपके ही गझल, का रे दुरावा, युवती मना हे नाट्यपद तसेच वरद कठापूरकरने बासरीवर वाजवलेली पहाडी धून, तरु ण आहे रात्र अजूनी, भडकमकर यांनी शब्दावाचून कळले सारे, तसेच वरद-श्रुतीने एकत्रित वाजविलेली राग वाचस्पती, मोगरा फुलला, भेटी लागी जीवा, तीर्थ विठ्ठल, केव्हा तरी पहाटे, स्वप्नात रंगले मी तसेच मोझार्ट सिंफनी वाजवली. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन पूर्वी भावे यांनी केले. (प्रतिनिधी)
वसंतोत्सव संगीत महोत्सवाला डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद
By admin | Updated: May 4, 2015 23:55 IST