Join us

ऋतिक-सुसानचा अखेर घटस्फोट

By admin | Updated: November 2, 2014 01:52 IST

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुसान खान या गेले 1क् महिने विभक्त राहणा:या दाम्पत्यास वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने शनिवारी घटस्फोट मंजूर केला.

कोर्टाची मंजुरी : 13 वर्षाचे सहजीवन सलोख्याने संपुष्टात
मुंबई:  बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुसान खान या गेले 1क् महिने विभक्त राहणा:या दाम्पत्यास वांद्रे येथील कुटुंब न्यायालयाने शनिवारी घटस्फोट मंजूर केला. अशा प्रकारे बालपणीच्या मैत्रीचे प्रेमात आणि नंतर विवाहबंधनात रूपांतर झालेले ऋतिक आणि सुसानचे गेल्या 13 वर्षाचे सहजीवन संपुष्टात आले आहे.
उभयपक्षी संमतीने घटस्फोट घेण्यासाठी ऋतिक आणि सुसानने सुमारे सहा महिन्यांपूर्वी केलेला दावा कुटुंब न्यायालयाने मंजूर केला. कायद्यानुसार अशा प्रकारे सहमतीचा घटस्फोट घेऊ इच्छिणा:या दाम्पत्यास किमान सहा महिने विभक्त राहावे लागते. ऋतिक आणि सुसान न्यायालयात अर्ज करण्याच्या आधीपासूनच वेगळे राहात होते. त्यामुळे हा अर्ज करण्यामागे कोणतीही जुलूम-जबरदस्ती नाही याची खात्री पटल्यावर न्यायालयाने या दोघांना विवाहबंधनातून मुक्त केले.
काळी हॅट आणि काळे कपडे घातलेला ऋतिक व कॉलर असलेला पांढरा टी शर्ट घातलेली सुसान वकिलांसह एकत्रच न्यायालयात आले व कामकाज संपल्यावर पुन्हा एकत्रच रवाना झाले. ऋतिक व सुसानला :हेहान (7 वर्षे) व हृदान (5 वर्षे) असे दोन मुलगे असून, दोन्ही मुले आईसोबत वर्सोवा येथे राहतात. घटस्फोटानंतर मुलांचा ताबा आई व वडील या दोघांकडे असेल व ऋतिक आणि सुसान आपल्या अपत्यांना हवे तेव्हा भेटू शकतील. न्यायालयीन कागदपत्रंमध्ये घटस्फोटाच्या अटी आणि शर्ती अथवा पोटगी वगैरेचा कोणताही उल्लेख नाही. उभयतांनी या सर्व गोष्टी न्यायालयाबाहेर ठरविल्या असून त्यांचे पालन करण्याच उभयतांनी दिलेले आश्वासन न्यायालयाने नोंदवून घेतले आहे. बालपणीचे मित्र असलेल्या ऋतिक व सुसानने सुमारे चार वर्षे प्रेमसंबंधांत राहिल्यानंतर 2क् डिसेंबर 2क्क्क् रोजी विवाह केला होता. गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला होता.  (विशेष प्रतिनिधी)
 
पोटगी, कटुताही नाही
या घटस्फोटात ऋतिक सुसानला 100 कोटी रुपयांची पोटगी देणार असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. पण सुसानने याचा इन्कार केला होता. ऋतिक रोशनचे वकील अॅड. दीपेश मेहता यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारे पोटगीचा विषय न काढता अथवा कोणत्याही प्रकारची लिखापढी न करता दोघांनी आगळ्य़ा व शानदार पद्धतीने काडीमोड घेतला आहे. सर्व काही विश्वास, श्रद्धा व सन्मानाने झाले आहे. खरे तर कोणतीही कटुता न ठेवता वेगळे कसे व्हावे याचा त्यांनी इतरांना आदर्श घालून दिला आहे.