उत्तर सादर करण्याचे आदेशमुंबई : डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कशा प्रकारे सोडवणार आहे? त्यासाठी शासनाकडे यंत्रणा आहे का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले.डॉक्टरांच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनाने रुग्णांचे हाल झाले. त्यामुळे या डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अॅड. दत्ता माने यांनी दाखल केली आहे. मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात डॉक्टरांनी संप मागे घेतल्याचे राज्य शासनाने न्यायालयाला सांगितले. मात्र याआधीही डॉक्टरांनी संप केला होता व न्यायालयाने डॉक्टरांच्या समस्येसाठी यंत्रणा स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अशी यंत्रणा आहे का, याचे प्रत्युत्तर शासनाने सादर करावे, असे आदेश देत खंडपीठाने ही सुनावणी तहकूब केली. (प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या समस्या कशा सोडवणार?
By admin | Updated: July 7, 2015 02:58 IST