ठाणो : पालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असून कर्मचा:यांचे काही भत्तेही रोखून ठेवण्यात आले आहेत. असे असताना आता पालिकेने ज्या कर्मचा:यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देता येत नाही, अशा कर्मचा:यांना 12 वर्षाच्या सेवेनंतर त्यांच्या पदोन्नती साखळीतील वरच्या पदावरील वेतनश्रेणी देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या शुक्रवारी होणा:या महासभेत आणला आहे.
तो मंजूर झाल्यास पालिकेच्या तिजोरीवर वार्षिक अंदाजे 13 कोटी 96 लाख 44 हजार 612 रुपयांचा बोजा पडणार आहे. परंतु, पालिकेची सध्याची परिस्थिती पाहता वरच्या पदाची ही वेतनश्रेणी वेळेत हाती पडेल का, याबाबत पालिका कर्मचा:यांमध्ये शंका निर्माण झाली आहे.
1 ऑक्टोबर 1994 पासून गट क व ड मधील ज्या शासकीय कर्मचा:यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नाही, अशा कर्मचा:यांना पदोन्नतीची कुंठीतता घालविण्यासाठी 12 वर्षाच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या पदोन्नती साखळीतील वरच्या पदावरील वेतनश्रेणी देण्याबाबत तसेच ज्या कर्मचा:यांना पदोन्नतीसाठी पद अस्तित्वात नाही, अशा कर्मचा:यांना देण्याचे निश्चित केले आहे. शासन निर्णयानुसार यासंदर्भात महासभेतही ठराव करण्यात आला आहे. तसेच जे कर्मचारी विभागीय परीक्षा उत्तीर्ण नाहीत, त्यांना 15 वर्षाच्या नियमित सेवेनंतर या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे शासकीय कर्मचा:यांना 1 ऑक्टोबर 2क्क्6 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, आता ठाणो महापालिकेतील कर्मचा:यांनादेखील त्याच वर्षापासून आणि त्याच महिन्यापासून ही वेतनश्रेणी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
4महापालिका कर्मचा:यांना वैद्यकीय भत्त्यापोटी दरवर्षी पाच हजार रुपये दिले जातात. होळी आणि गणोशोत्सवाच्या काळात दोन टप्प्यांत त्यांना हे पैसे दिले जातात.
4मागील वर्षभरापासून त्यांना हा भत्ता देण्यात आला नाही. तो अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे या वेतनश्रेणीचा लाभ वेळेत मिळणार का, असा सवाल आता पालिका कर्मचारी करीत आहेत.